पुणे : २०६ व्या शौर्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील पेरणे फाटा येथील विजयस्तंभास वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले. इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी सहभागी होण्यावरून चर्चा सुरू आहे. त्या सर्व चर्चांदरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली. याबाबत आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही एकत्र येणारच आहोत. त्यामुळे कधी ना कधी औपचारिक अनौपचारिकरित्या भेट होणारच आहे. त्यामुळे अफवा पसरवण्यात काहीही अर्थ नाही. इंडिया आघाडीमध्ये आम्हाला कधी घ्यायचे हे आत्ता त्यांनी ठरवायचं आहे. पण आत्ता तरी आमच्यासाठी इंडिया आघाडीचे दार बंद आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

हेही वाचा – “अजितराव… टोपी उड जायेगी”, संजय राऊतांना अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले, “असल्या सोम्यागोम्याने..”

हेही वाचा – थंडीच्या लाटांची शक्यता कमीच

नवीन वर्षाच्या संकल्पाबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सत्तेत येणे, संविधान वाचवणे, शांतता हे आमचं या वर्षाचं संकल्प असणार.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will vanchit bahujan aghadi get entry into the india allaince prakash ambedkar replied in pune svk 88 ssb
Show comments