सध्या शरद पवार गटाने महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केले नाहीत. विविध मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास मी निवडणूक लढण्यास इच्छुक असून निवडणूक जिंकेलही, असा विश्वास बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. ते आळंदीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीड लोकसभा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत. पैकी, ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांच नाव आघाडीवर आहे. बजरंग सोनवणे यांनी २०१९ ला झालेल्या बीड लोकसभेत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रीतम मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा बजरंग सोनवणे हे प्रीतम मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

हेही वाचा – ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. माझ्या विरोधात प्रीतम मुंडे असो की पंकजा मुंडे, मला काही अडचण नाही, असे म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यास बीड लोकसभा लढणार आणि जिंकणार, असा आत्मविश्वास सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. बजरंग सोनवणे यांनी आज आळंदीत माऊलींच्या समधीचे दर्शन घेतलं, त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Willing to contest beed lok sabha be it pankaja munde or pritam munde i will fight bajrang sonwane kjp 91 ssb