पुणे : झटपट पैसे कमाविण्यासाठी वायरमनने दुचाकी चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. दुचाकी चोरुन पसार झालेल्या वायरमनला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. कुणाल सुरेश बधे (वय २९, रा. रांजणे, ता. वेल्हा, जि. पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक कात्रज भागातील आंबेगाव परिसरात गस्त घालत होते. लिपाणे वस्ती भागात दुचाकी चोरटा थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयावरुन बधेला ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : पुण्यातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दिशेने पाऊल…

त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. चौकशीत बधेने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. बधे वायरमन आहे. झटपट पैसे कमाविण्यासाठी त्याने दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बधे याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक गिरीश दिघावकर, अमोल रसाळ, धीरज गुप्ता, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, सचिन सरपाले आदींनी ही कामगिरी केली.