पुण्याभोवतीच्या विकसनशील भागांमध्ये येत्या तीन ते चार वर्षांमध्ये ८ हजार १७६ सदनिका उपलब्ध होणार असून या प्रकल्पांसाठी अडीच एफएसआय मिळाल्यामुळे या घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्यातील असतील, अशी माहिती म्हाडाचे पुणे विभागाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर उपस्थित होते. म्हाळुंगे, चाकण, मोरवाडी, ताथवडे, संत तुकारामनगर, पिंपळे वाघिरे या ठिकाणी म्हाडाच्या वतीने नवे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. म्हाळुंगे येथे १ हजार ४०० घरे बांधण्यात येणार असून त्यासाठी म्हाडाने ३० एकर जागा खरेदी केली आहे. मोरवाडी पिंपरीमध्ये ८८८, संत तुकारामनगरमध्ये २५०, ताथवडेमध्ये १ हजार ३५१, पिंपळे वाघिरेमध्ये १ हजार १४५ सदनिका उपलब्ध होणार आहेत. या शिवाय हिंदुस्तान अँटीबायोटिक्स या कंपनीची ६ एकर जागाही म्हाडाने लिलावात विकत घेतली असून त्या ठिकाणी ७८८ सदनिका बांधण्यात येणार आहेत.
यावेळी काकडे म्हणाले, ‘‘येत्या ३ ते ४ वर्षांमध्ये हे प्रकल्प पूर्ण होतील. म्हाळुंगे येथील कामाची सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या हद्दीत असलेल्या म्हाडाच्या काही जागांवर महापालिकेने आरक्षण लावले आहे. ते उठवण्यासंबंधी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन म्हाडाच्या जागांवर आरक्षण लावू नये अशी विनंती करण्यात आली आहे. या विनंतीला मुख्यमंत्र्यानी संमती दिली आहे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा