धर्मांतर करण्यासाठी एका ३२ वर्षीय महिलेला धमकावून तिला एका घरात डांबून ठेवण्यात आले. महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एका ३२ वर्षीय पीडित महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, संतोष रामदास गायकवाड (वय ५५, रा. विठ्ठल मंदिरासमोर, धानोरी), सागर मधुकर लांडगे (वय ३०,रा. गल्ली क्रमांक ३, माधवनगर, धानोरी), तसेच एका महिलेला अटक करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिला ओळखीचे आहेत. आरोपींनी पीडित महिलेला धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली. तिला धानोरी परिसरात बोलवले. आरोपी महिलेच्या धानोरी येथील घरात संतोष गायकवाड आणि सागर लांडगे यांनी तिला डांबून ठेवले. यानंतर दोघांनीही पीडितेला पिस्तुलाचा धाक धाकवून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीने महिलेवर बलात्कार केला. या घटनेची मोबाइलर चित्रीकरण करुन समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी सागर लांडगे याने पीडित महिलेला लोहगाव परिसरात नेले. तेथे तिला एका खोलीत डांबून ठेवले. त्याने महिलेला धमकावून वेळोवेळी अत्याचार केले, असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध बलात्कार, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून, सहायक पोलिस निरीक्षक सचिन धामणे करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman alleges rape after locking in home forced for religious conversion pune print news rbk25 zws