सासरच्या छळामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढवा भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पूनम युवराज कोंढरे (वय ३२, रा. शिक्षक सोसायटी, कोंढवा) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे: पौड रस्त्यावर किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी; पाच जणांविरोधात गुन्हा

या प्रकरणी पती युवराज कोंढरे, दीर योगेश, सासू शकुबाई, आणि नणंद सुखदा ( सर्व रा. गोकुळनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम यांचा भाऊ कैलास अशोक तावरे ( रा. केळेवाडी, पौड रस्ता, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. पूनम आणि युवराज यांचा २००८ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर पूनमचा छळ करण्यात आला. छळामुळे तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक हरीश शिळीमकर तपास करत आहेत.