पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची वाघोली परिसरात घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुंदा आदिनाथ ढुस (वय ५६, रा. साईनाथनगर, वडगाव शेरी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कुंदा यांचा भाऊ संजय ठाणगे (वय ५०, रा. वैष्णवी सदन, साईनाथनगर, वडगाव शेरी), त्यांची पत्नी अनिता (वय ४५),मुलगा ऋषीकेश (वय २८), मंदा रमेश कुऱ्हे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंदा यांची विवाहित मुलगी अनुपमा सुक्रे (वय ३३, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा…मित्र पक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्यावर श्रीरंग बारणे यांचा भर, गाठीभेटी सुरू

कुंदा यांना चार मुली असून, त्या विवाहित आहेत. वडिलोपार्जित संपत्तीवरुन त्यांचे भावाशी वाद सुरू होते. कुंदा काही दिवसांपूर्वी वाघोली परिसरात राहणाऱ्या विवाहित मुलीकडे आल्या होत्या. मुलीच्या घरी त्यांनी पंख्याला स्कार्फ बांधून नुकतीच आत्महत्या केली. संपत्तीचा वादातून मामा आणि नातेवाईकांनी आई कुंदा हिला त्रास दिल्याने तिने आत्महत्या केल्याचे अनुपमा सुक्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा…काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा, मात्र अकोला लोकसभेसाठी काँग्रेसला पाठिंबा मागितलेला नाही – ॲड. प्रकाश आंबेडकर

अनुपमा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास करे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक थोरबोले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman commits suicide in pune over property dispute case registered against brother and relatives pune print news rbk 25 psg