लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : पतीने घरातून हाकलून दिल्याने महिलेने सोसायटीच्या जिन्यात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवार पेठेत घडली. पतीने घरातून हाकलून दिल्यानंतर महिला तीन दिवस उपाशी होती.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
AAP MLA Gurpreet Gogi
पंजाबमधील आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, लुधियाना डीएमसी रुग्णालयात प्राणज्योत मालवली
Delisa Perera
वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
suicide in barabanki uttar pradesh
“अधुरी एक कहाणी…”, पत्नीच्या कुटुंबीयाच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या; फेसबूकवर लिहिली सुसाईड नोट!
thane woman suicide latest news in marathi
ठाणे : सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

सुलभा सुरेंद्र पुजारी (वय ४२, रा. वैष्णव अपार्टमेंट, रविवार पेठ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती सुरेंद्र रवींद्र पुजारी (वय ४२), दीर समीर, सासू रजनी यांच्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुलभा यांचा भाऊ रवी वाघे (वय ४४, रा. गणेशनगर, उस्मानाबाद) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरेंद्र पुजारी आणि त्याचे कुटुंबीय सुलभा यांचा छळ करत होते. शारीरिक, मानसिक त्रासामुळे सुलभा त्रासल्या होत्या.

आणखी वाचा-हौसेपायी लाखोंचा खर्च! मोटारीचा ९ क्रमांक ठरला सर्वांत महागडा, ‘या’ क्रमांकांनाही सर्वाधिक पसंती

सुरेंद्रने सुलभाला घरातून हाकलून दिले. सुलभा तीन दिवस सोसायटीच्या जिन्यात राहत होत्या. त्यांना जेवणही देण्यात आले नव्हते. तीन दिवसांपूर्वी सुलभा यांनी जिन्याच्या शेजारी असलेल्या खिडकीला दोर बांधून गळफास घेतला. सुलभा यांचा भाऊ रवि यांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर ते पुण्यात आले. चौकशीत सुलभा यांचा छळ करण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर रवि यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शेडगे तपास करत आहेत.

Story img Loader