पुण्यातील खडकवासला धरणामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, याचा हवेली पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला पानशेत रोडवरील चौपाटीजवळ पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. मृत महिलेचे वय ३० ते ३५ वर्षे असून ती विवाहित असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिलेच्या मृतदेह बाहेर काढल्यानंतर तिच्या हातामध्ये राखी बांधल्याचे दिसून आले. मात्र तिची ओळख पटेल, अशी कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. मृतदेहाच्या हातामध्ये असणाऱ्या राखीमुळे तिने नैराश्यातून आत्महत्या केली आहे, की तिचा खून झाला आहे, याबाबत हवेली पोलीस तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman dead body found in khadakwasla dam haveli police investigating the murder or suicide
First published on: 08-08-2017 at 17:33 IST