पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर भरघाव कारच्याच्या धडकेने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नवले पुलाजवळ ही घटना घडली. अपघातात तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींमध्ये चार वर्षांच्या बालकाचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योजना शिवशंकर महंत (वय ३२, रा. बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अपघातात योजना यांचे पती शिवशंकर सुभाष महंत (वय ३६), त्यांचा मुलगा शिवांश (वय ४), अमोल भीमराव सुरवसे (वय ३७, रा. मोशी) जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर महंत आणि अमोल सुरवसे मित्र आहेत. सुरवसे आणि महंत कुटुंबीय शनिवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी काेकणात पर्यटनासाठी निघाले होते. अमोल सुरवसे, त्यांची पत्नी, लहान मुलगी बाह्यवळण महामार्गावर मोटारीत महंत कुटुंबीयांची वाट पाहत थांबले होते. महंत कुटुंबीय कारमधून तेथे आले.

हेही वाचा: राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाखांचं बक्षीस, पुण्यात राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी

त्या वेळी त्यांना नेण्यासाठी सेवा रस्त्याने अमोल सुरवसे चालत निघाले होते. योजना, त्यांचा मुलगा शिवांश, पती शिवशंकर सेवा रस्त्यावर थांबले होते. त्या वेळी भरधाव मोटारीने योजना, शिवांश, शिवशंकर, अमोल यांना धडक दिली. अपघातानंतर कार चालक पसार झाला. अपघातात योजना गंभीर जखमी झाल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान योजना यांचा मृत्यू झाला. पसार झालेल्या कारचालकाचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman died after being hit by a car on the mumbai bangalore bypass pune print news tmb 01