पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार डॉक्टर महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-हांडेवाडी रस्त्यावर घडली. याप्रकरणी ट्रकचालकाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. डॉ. प्रणाली तन्मय दाते (वय ३४, रा. व्हीटीपी अर्बन सोसायटी, उंड्री) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक पांडुरंग बलभीम भोसले (वय ३५, रा. तुळजापूर, जि. धाराशिव) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. दाते यांचा उंड्री परिसरात दवाखाना आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी

डॉ. दाते बुधवारी (८ जानेवारी) दुपारी बाराच्या सुमारास दुचाकीवरुन हांडेवाडीकडे निघाल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. दुचाकीस्वार डॉ. दाते पडल्या. ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. काळेपडळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी ट्रकचालक भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन बुधवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. डॉ. दाते यांच्यामागे पती आणि मुलगा असा परिवार आहे. त्यंचे पती डाॅक्टर आहेत.

हेही वाचा >>> पिंपरी : डेअरी फार्म येथील उड्डाणपूल मार्चअखेर खुला?

बाह्यवळण मार्ग धोकादायक कात्रज ते मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरुन अवजड वाहने जातात. बाह्यवळण मार्गावरील हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, कोंढवा भागात दाट वस्ती आहे. बाह्यवळण मार्गाजवळ सोसायट्या आहेत. शहरातू ये जा करणारी अवजड वाहने बाह्यवळण मार्गावरुन जातात. यापूर्वी या रस्त्यावर भरधाव अवजड वाहनांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडले आहेत. बहुतांश अपघात वाहनचालकांच्या चुकांमुळे झाले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman doctor riding bike dies in truck collision accident on katraj handewadi road pune print news rbk 25 zws