मधुचंद्रासाठी मालदीवला गेल्यावर पतीने शरीरसंबंध ठेवले नाहीत. एवढेच नाही तर, त्यासाठी सक्षम नसल्याचे ध्यानात आल्यानंतर उच्चशिक्षित पत्नीने पोलिसांकडे पतीसह सासू सासऱ्यांविरोधात फसवणूक आणि छळवणूकीची तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा >>> पुणे : आईच्या बँक खात्यातील ११ काेटींच्या रकमेवर मुलाचा डल्ला
त्यानुसार चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत विवाहिता बी.टेक. आणि एम.बी. ए असून ती एका बड्या कंपनीत नोकरी करते. तर तिचा पती अभियंता असून तोही एका कंपनीत काम करतो. दोघांचा एप्रिल २०२२ मध्ये विवाह झाला होता. यानंतर ते मधुचंद्रासाठी मालदीवला गेले होते. परंतु, त्यांच्यामध्ये पती-पत्नीप्रमाणे कोणतेच संबंध आले नाहीत. त्यानंतर पती सातत्याने संबंध ठेवण्यासाठी टाळाटाळ करत होता. शयनगृहामध्ये पती-पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी निद्रीस्त जात असत. जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता ‘दम कोंडल्यासारखे होते’ असे म्हणून पती लांब झोपत असे. त्यानंतर पती आणि सासू सासऱ्यांनी मारहाण करुन पीडीतेला माहेरी सोडले होते. तरीही समझोता करून ती पुन्हा सासरी आली. मात्र, पती शरीरसंबंध ठेवण्यास अपात्र असल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.