पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत पादचारी तरुणी मृत्युमुखी पडल्याची घटना कर्वे रस्त्यावर परिसरात सकाळी घडली. मोबाइलवर गप्पा मारत निघालेली दुभाजक ओलांडत होती. त्यावेळी भरधाव डंपरने तिला धडक दिली. कर्वे रस्त्यावर गंभीर स्वरुपाच्या अपघातांचे सत्र कायम आहे

आरती सुरेश मनवाने (वय २३, रा. एरंडे हॉस्टेल, भेलके नगर, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. आरती मूळची अमरावतीमधील आहे. ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. अपघाताची माहिती तिच्या कुटुंबीयांना कळविण्यात आली आहे. तिचे कुटुंबीय पुण्याकडे रवाना झाले आहेत. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहित अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता रोकडे यांनी दिली.

Villagers set fire to police outpost in West Bengal after 9-year-old girl’s rape-murder
Rape and Murder Case : धक्कादायक! नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, संतप्त गावकऱ्यांनी पोलीस चौकीच पेटवली!
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
Narhari Jhirwal and st cast mla jumped from mantralaya
Narhari Zhirwal : VIDEO : पेसा भरतीच्या मुद्द्यावरून नरहरी झिरवळांसह आदिवासी समाजाच्या आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षक जाळीवर मारल्या उड्या
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
Task Fraud, Retired intelligence officer, Mumbai,
मुंबई : सेवानिवृत्त गुप्तवार्ता अधिकाऱ्याचे टास्कच्या नादात खाते रिकामे, तीन दिवसांत गमावले ११ लाख
Student died Borivali , dumper, mumbai,
बोरिवलीमध्ये डंपरच्या धडकेत विद्यार्थ्याचा मृत्यू
school girl sexual abuse by relative in pune
गुंगीचे इंजेक्शन देऊन शाळकरी मुलीवर अत्याचार; शाळेतील तक्रार पेटीमुळे अत्याचाराला वाचा

हेही वाचा >>> प्रदूषण करणाऱ्या कंपनीचे वीज, पाणी बंद करा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका

आरतील एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे कामावर निघाली होती. कर्वे रस्त्यावरील दामोदर व्हिला सोसायटीकडून ती कोथरूडमधील बसस्थानककडे निघाली होती. ती दुभाजकावर चढून रस्ता ओलांडत होती. त्यावेळी ती मोबाईलवर बोलत होती. समोरून भरधाव वेगाने आलेला डंपर तिच्या नजरेस पडला नाही. डंपरच्या चाकाखाली ती चिरडली गेली. तिचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताचे दृश्य पाहून या भागातून निघालेले वाहनचालक, तसेच नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. वाहनचालकांनी डंपरचा पाठलाग करुन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, डंपरचालक भरधाव वेगात पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच अलंकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कर्वे रस्ता परिसरातील वाहतूक काही विस्कळीत झाली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवड: धमकी, मारहाणीला कंटाळून मित्राची हत्या; केला असा प्लॅन..पण पोलिसांनी पाठलाग करून….

मोबाइलवरील संभाषण जीवघेणे

शहर, परिसरात मोठ्या संख्येने परगावातील विद्यार्थी शिक्षणासाठी स्थायिक झाले आहे. वाहन चालविताना अनेकजण मोबाइलवर संभाषण करतात. अनेकजण मोबाइलवर गप्पा मारत रस्ता ओलांडतात. मोबाइलवर बोलत रस्ता ओलांडणे, तसेच वाहन चालविताना मोबाइलचा वापर केल्याने गंभीर, तसेच किरकोळ स्वरुपाचे अपघात घडतात. कर्वे रस्त्यावर बुधवारी सकाळी डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला. तरुणी मोबाइलवर गप्पा मारत रस्ता ओलांडत होती. दुभाजकावर चढून ती रस्ता ओलांडता असताना तिला डंपरने धडक दिली.

कर्वे रस्ता मृत्यूचा सापळा कर्वे रस्ता गजबजलेला रस्ता आहे. दिवसा, तसेच रात्रीही या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. कर्वे रस्त्यावरील रसशाळा चौकात १९ ऑगस्ट रोजी सायकलस्वार निवृत्त कृषी अधिकारी सुनील भास्करराव देशमुख (वय ६०, रा. निको गार्डन, विमाननगर) यांचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. रससाळा चौकात जून महिन्यात जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकारी कृष्णा गणपती देवळी (वय ६७, रा. कोथरूड) यांचा मृत्यू झाला होता. ९ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास मद्याच्या नशेत असलेल्या टेम्पोचालकाने सहा वाहनांना धडक दिल्यची घटना घडली होती. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी गीतांजली श्रीकांत अमराळे (वय ३५, रा. शास्त्रीनगर,कोथरुड) यांचा मृत्यू झाला होता. अपघातात दुचाकीस्वार श्रीकांत गंभीर जखमी झाले होते.