पुणे : अनैतिक संबंधातून देण्यात येणाऱ्या त्रासामुळे महिलेने पिंपरीतील उपाहारगृहचालक विजय ढुमे यांचा साथीदारांशी संगनमत करुन खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ढुमे यांचा सिंहगड रस्ता भागातील एका लॉजसमोर दोन दिवसांपूर्वी खून झाला होता. सिंहगड रस्ता पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करुन महिलेसह साथीदारांना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> प्रसिद्ध पर्यटनस्थळ लोणावळा येथे आधी पर्यटक मुलींचं अपहरण, मग सामूहिक बलात्कार, पोलिसांकडून मोठी कारवाई

याप्रकरणी सुजाता समीर ढमाळ (रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता), संदीप दशरथ तुपे (वय २७, रा. कांदलगाव, ता. इंदापूर, जि. पुणे), सागर संजय तुपसौंदर (वय १९, रा. सहकारनगर), प्रथमेश रामदास खंदारे (वय २८, रा. उंड्री) यांना अटक करण्यात आली आहे. चिंचवडमधील रहिवासी विजय वसंतराव ढुमे (वय ४८) उपाहारगृहचालक आहेत. ढुमे यांचे वडील पुणे पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे संंबंध होते. त्यांचे पिंपरी परिसरात उपाहारगृह आहे. शुक्रवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास ढुमे वडगाव बुद्रुक भागातील क्लालिटी लॉजमधून बाहेर पडले. त्यावेळी अंधारात दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केला होता.

हेही वाचा >>> तांत्रिक कामांसाठी रेल्वे ब्लॉक, पुढील दोन दिवस अनेक गाड्या रद्द

ढुमे यांचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ढुमे यांच्या खुनामागचे कारण न समजल्याने पोलिसांनी निकटवर्तीयांची चौकशी सुरू केली होती. तपासात ढुमे यांचे सुजाताशी अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पाेलिसांनी सुजाताशी चौकशी सुरू केली. ढुमे सुजाताला त्रास देत होता. त्याचा त्रासामुळे तिने संदीपशी संगनमत करुन ढुमे यांचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले. पोलिसांनी सुजाता, संदीप आणि साथीदारांना ताब्यात घेतले. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक आयुक्त सचिन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर, उपनिरीक्षक गणेश मोकाशी, आबा उत्तेकर, सतीश नागूल, सुनील चिखले, संजय शिंदे, देवा चव्हाण, अमोल पाटील आदींनी ही कारवाई केली. आरोपी सुजाता हिच्याशी गेल्या १३ वर्षांपासून उपाहारगृहचालक ढुमे याचे अनैतिक संबंध होते. सुजाताचे चार महिन्यांपूर्वी आरोपी संदीप तुपे याच्याशी अनैतिक संबंध जुळले. दोघांची समाजमाध्यमातून ओळख झाली होती. ढुमे याच्या त्रासामुळे तिने संदीपशी संगनमत करुन ढुमेचा खून करण्याचा कट रचला.