पुणे : औषध विक्रेत्याची फसवणूक केल्या प्रकरणी एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. जोशी यांची पत्नी बोलत असल्याचे सांगून एका महिलेने औषध विक्रेत्याकडील दहा हजार रुपयांची रोकड लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांपूर्वी नगर रस्त्यावर एका महिलेने डॉक्टर कुलकर्णी असल्याचे सांगून सराफी पेढीतील व्यवस्थापकास दोन लाख रुपयांचा गंडा घातला होता.

याबाबत मुकेश वालचंद जैन (रा. लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील लेक टाऊन येथे जैन यांचे एम जे. सर्जीकल मेडीकल असून त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एका महिलने संपर्क साधला. डाॅ. जोशी यांची पत्नी बोलत असल्याचे महिलेने सांगितले. कंबरेचा पट्टा आणि वाॅकर सातारा रस्त्यावरील रुग्णालयात पाठवून द्या. माझ्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहे. त्याबदल्यात तुम्ही मला पाचशे रुपयांच्या नोटा द्या, असे महिलेने सांगितले. त्यानंतर जैन यांनी कामगार रवींद्रकुमार याला कंबरपट्टा, वाॅकर आणि दहा हजार रुपये घेऊन रुग्णालयाच्या परिसरात पाठविले. त्यानंतर रुग्णालयाच्या परिसरात एकजण रवींद्रकुमार यांना भेटला. डाॅ. जोशी यांच्या पत्नीने मला पाठविले आहे. तुमच्याकडील दहा हजार रुपयांची रोकड मला द्या. मी मॅडमकडून पैसे घेऊन येतो, असे सांगून त्याने रवींद्रकुमार याच्याकडून दहा हजार रुपये घेतले.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!

हेही वाचा – जयंत पाटलांना लग्नाच्या वाढदिवशी ईडीची नोटीस, अजित पवार म्हणाले, “माझा आणि त्यांचा…”

बराच वेळ झाला तरी पैसे घेऊन गेलेला आरोपी परत आला नाही. तेव्हा रवींद्रकुमार रुग्णालयात गेला. तेव्हा पैसे घेऊन गेलेली व्यक्ती पसार झाल्याचे उघडकीस आले.