पुणे: कात्रज परिसरात पादचारी महिलेचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला ही कात्रजमधील सुखसागरनगर परिसरातून निघाली होती. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ४५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून माग काढण्यात येत आहे. पोलिसांनी सुखसागरनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा