पुणे: कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याला अटक केली आहे. यवत पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली.डॉ. वंदना मोहिते असे अटक करण्यात आलेल्या महिलेची नाव आहे. त्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्ष आहेत. यासंदर्भात पोलीस नाईक नितीन भानुदास कोहक यांनी तक्रार दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आषाढी वारी निमित्त कासुर्डी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. या मार्गावरून पुणे शहराकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. पोलीस नाईक नितीन कोहक हे त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. दरम्यान वंदना मोहिते या मोटारने त्या ठिकाणी आल्या. यावेळी पुण्याकडे जाण्यासाठी त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. वंदना मोहिते यांनी नितीन कोहक यांच्या कानाखालीदेखील मारली. त्यानंतर गाडीतून खाली उतरत त्यांनी बॅरिकेट बाजूला केले आणि निघून गेल्या.

हेही वाचा >>>पुण्यात नोकरीसाठी आलेल्या २८ वर्षीय उच्चशिक्षित तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न!; पत्राद्वारे मागितला न्याय

दरम्यान, यवत पोलिसांनी या प्रकरणी शासकीय कामकाजात अडथळा आणण्या प्रकरणी वंदना मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुरुवारी रात्री वंदना मोहिते यांना राहत्या घरातून अटक केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman office bearer of ncp in baramati arrested for assaulting a policeman rbk 25 amy