पुणे : तीव्र डोकेदुखी आणि चालताना होणाऱ्या असह्य वेदनांनी एक ५७ वर्षीय महिला त्रस्त होती. तिच्या मेंदूच्या मागील भागात आणि पाठीच्या मणक्यात गाठी निर्माण झाल्या होत्या. अतिशय दुर्मीळ अशा मेनिन्जिओमा विकाराचे निदान तिला झाले. डॉक्टरांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तिच्यावर यशस्वीपणे उपचार केले. त्यामुळे तिची वेदनांपासून सुटका होऊन ती दैनंदिन जीवन व्यवस्थितपणे जगत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेनिन्जिओमा हा विकार मेंदूची गाठ असलेल्या केवळ १ ते १० टक्के रुग्णांमध्ये आढळतो. मेंदूच्या मागील भागात आणि पाठीच्या कण्यात दोनपेक्षा अधिक गाठी निर्माण झाल्याने ही महिला असह्य वेदना अनुभवत होती. तीव्र डोकेदुखी, तसेच अशक्तपणा आणि पायांमध्ये कडकपणा आल्याने ही महिला त्रासलेली होती. या महिलेने अनेक रुग्णालयांत उपचार घेतले होते; परंतु, तिच्या वेदना कमी झाल्या नव्हत्या. अखेर तिला हडपसरमधील सह्याद्री सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

आणखी वाचा-पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू

रुग्णाची शारीरिक अवस्था पाहून डॉक्टरांनी तातडीने तिची वैद्यकीय तपासणी केली. गाठीमुळे रुग्णाच्या मेंदूच्या मागच्या बाजूला, लहान मेंदू आणि मज्जारज्जू यावर खूप दाब निर्माण झाल्याचे एमआरआय तपासणीत निदर्शनास आले. तसेच त्या गाठींमुळे मेंदूतील रक्तप्रवाह सुरळीत होत नव्हता. परिणामी तिला असह्य डोकेदुखी जाणवत होती. डॉ. सिराज बसाडे यांनी शस्त्रक्रियेच्या मदतीने या महिलेच्या मेंदूतील दुर्मीळ मेनिन्जिओमा गाठ यशस्वीरीत्या बाहेर काढली. ही शस्त्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक होती. शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडावी यासाठी डॉक्टरांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली. शस्त्रक्रिया पार पाडल्यानंतर तिच्या प्रकृतीत मोठी सुधारणा दिसून आली. फिजिओथेअरपीच्या मदतीने तिच्या स्नायूंना बळकटीकरण मिळाले आणि काही दिवसांतच ही महिला सर्वसामान्य माणसांप्रमाणे चालू लागली.

अशी पद्धतीने शस्त्रक्रिया…

डॉक्टरांनी महिलेवर वॅण्ट्रीकुलोपॅरिटोनिअल प्रक्रिया सुरू केली. या उपचारांत महिलेच्या मेंदूतील अतिरिक्त स्राव काढला केला. त्यानंतर रुग्णाची डोकेदुखी नियंत्रणात आली. काही दिवसांनी महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांनी मेंदूतील गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मेंदूची कवटी मागच्या बाजूने उघडून गाठ काढण्याचे ठरविले. या शस्त्रक्रियेला पॉस्टेरिअर फॉस्सा क्रॅनिओटोमी असे संबोधले जाते. ही शस्त्रक्रिया अतिशय जटिल आणि गुंतागुंतीची असते. शस्त्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ नये म्हणून डॉक्टरांनी मॉनिटरिंग मशिनची मदत घेतली. अखेरीस मेंदूतील गाठ यशस्वीरीत्या काढण्यात वैद्यकीय पथकास यश आले.

आणखी वाचा-लाल दिव्याची गाडी आणि नैतिकता

या महिलेच्या मेंदूत ज्या भागात गाठ निर्माण झाली होती, ती एक लाख रुग्णांपैकी एकामध्येच आढळून येते. त्यामुळे शस्त्रक्रिया अचूक होण्यासाठी इंट्रा-ऑपरेटिव्ह मॉनिटरिंग मशिन आणि अल्ट्रासाउण्डची मदत घेतली गेली. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आम्ही मेंदूतील गाठ कोणत्याही अडथळ्याविना यशस्वीरीत्या बाहेर काढू शकलो. -डॉ. सिराज बसाडे, मेंदू शल्यचिकित्सक