लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: पुणे स्टेशन परिसरात उभ्या केलेल्या रिक्षावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस शिपायाला रिक्षाचालकाने धक्काबुक्की केल्याची घटना घडली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकास अटक केली.

ऋषभ बाबा पिसे (वय २३, रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक दीपमाला राजू नायर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिसे याने पुणे स्टेशन परिसरात नो पार्किंगमध्ये रिक्षा थांबवली होती.

हेही वाचा… चांदणी चौकातील नवम या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात

पोलीस शिपाई नायर यांनी त्याच्यावर कारवाई केली. तेव्हा पिसे याने नायर यांच्या हातातील ई-चलन यंत्र हिसकावून घेतले. पिसेने नायर यांना धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पिसे याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करत आहेत.