पुणे : भावाला दिलेले उसने पैसे मागत असल्याच्या रागातून महिलेने पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकले. या हल्ल्यात पती गंभीर भाजला असून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेवर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवणे येथील एका सोसायटीत गुरुवारी पहाटे ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – अजित पवारांना पुण्याचे पालकमंत्री करा – जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची मागणी

हेही वाचा – सावधान! पक्षी, प्राण्यांपासून बर्ड फ्लू संसर्गाचा मानवाला धोका

महादेव जाधव (वय ३०, रा. काजल हाइट्स, शिवणे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. जाधव यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव पती-पत्नी भाजीपाला विक्रीचे काम करतात. जाधव यांनी पत्नीच्या भावाला २ लाख ४० हजार रुपये उसने दिले होते. ते त्याच्याकडे सतत पैशांची मागणी करीत होते. या कारणावरून पती-पत्नीत वाद होत होते. जाधव गुरुवारी पहाटे घरी झोपलेले असताना पत्नीने त्यांच्या अंगावर उकळते पाणी टाकून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेत जाधव ५० टक्के भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश बाबर तपास करीत आहेत.