पुणे : महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार करुन तिची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरुड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष दत्तात्रय पवार (रा. मु पो. मेढा, जावळी, सातारा) याच्याविरुद्ध बलात्कार आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेशी आरोपी पवार याची जानेवारी २०१९ मध्ये ओळख झाली होती.
हेही वाचा >>> लोणावळ्यात हाॅटेलमधील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा
आरोपी पवारने महिलेला पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. तिच्याकडून वेळोवेळी आठ लाख ६८ हजार रुपये पवारने उकळले. त्यानंतर पवारने महिलेवर बलात्कार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक तांदळे तपास करत आहेत.
हेही वाचा >>> पुणे : पिंपरी- चिंचवडमध्ये २२ वाहनांची तोडफोड; पोलीस कर्मचाऱ्याला केली धक्काबुक्की
आरोपीच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे
महापालिकेत नोकरीच्या आमिषाने महिलेवर बलात्कार तसेच तिची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी संतोष पवार याच्या विरोधात यापूर्वी अशाच प्रकारचा एक गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्याने एका महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला होता. सदनिका खरेदी करुन देण्याच्या बतावणीने त्याने तिच्याकडून लाखो रुपये उकळले होते.