पुण्याच्या हिंजवडीत महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी ऋषभ निगमला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

हेही वाचा – पिंपरीत ३ पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद; दरोडा विरोधी पथकाची कारवाई

हेही वाचा – पुणे : ऑनलाइन टास्कमध्ये १५० रुपये कमावले; अन् गमावले साडेसतरा लाख

वंदना त्रिवेदी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. ऋषभ आणि वंदना दोघेही आयटी कंपनीत कामाला होते. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडीच्या लक्ष्मी चौकात पीजीमध्ये राहण्यास असलेल्या वंदना त्रिवेदी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेला ऋषभ आणि मृत वंदना हे दोघे सोबत राहत होते.

खून केल्यानंतर ऋषभ मुंबईच्या दिशेने जात होता. मुंबई पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये तो पिस्तुलासह आढळला. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याने खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली. हा प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असल्याचे समोर आले असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Story img Loader