पुणे : ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कोथरुड परिसरातील पौड रस्त्यावर घडली.रंजना दाभेकर (वय ६०, रा श्रीराम सोसायटी, वारजे) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार मुग्धा दाभेकर (वय ३०) जखमी झाल्या आहेत. याबाबत सुहास बाळकृष्ण दाभेकर (वय ५६) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सुहास दाभेकर यांची सून दुचाकीस्वार मुग्धा आणि बहीण रंजना पौड रस्त्यावरुन जात होत्या. त्या वेळी दुचाकीला सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. अपघातात रंजना आणि मुग्धा गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वी रंजना यांचा मृत्यू झाला होता.
अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक पांढरे तपास करत आहेत.