पुणे : शासकीय नोकरीच्या आमिषाने एका महिलेची १९ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याप्रकरणी सुनील नामदेव गडकर आणि किरण सुनील गडकर (रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला कात्रज भागात राहायला आहे. आरोपी गडकर यांची महिलेशी एका परिचितामार्फत ओळख झाली. आरोपींनी महिलेला शासकीय नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले. शासकीय विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ओळख असल्याची बतावणी आरोपींनी महिलेकडे केली. त्यानंतर आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी १९ लाख १९ हजार रुपये घेतले.

हेही वाचा – पुणे : दिवाळी संपताच चोरट्यांचा धुमाकूळ, लुटमारीच्या घटना वाढीस

हेही वाचा – हत्तीच्या केसांचे दागिने विकणाऱ्या पुण्यातील सराफाविरुद्ध गुन्हा, वन्यजीव कायद्यान्वये कारवाई

महिलेने आरोपी गडकर यांना जुलै महिन्यात पैसे दिले. त्यानंतर महिलेला नोकरी न मिळाल्याने तिने आरोपींकडे विचारणा केली. गडकर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड तपास करत आहेत.