लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील ६१ हजारांची सोनसाखळी चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला नाशिकमधील आहेत. त्या बुधवारी तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास त्या तुळशीबागेतील एका विक्रेत्याकडून खरेदी करत होत्या. त्यावेळी गर्दीत चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ६१ हजारांची सोनसाखळी चोरुन नेली. पोलीस कर्मचारी जाधव तपास करत आहेत.

आणखी वाचा-महाराष्ट्र वारकऱ्यांच्या विचाराने पुढे जात राहील- देवेंद्र फडणवीस

कात्रज भागातील राजस सोसायटी परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची मुलगी कात्रज भागातील एका शाळेत आहे. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी निघाल्या होत्या. सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर त्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाडीची वाट पाहत थांबल्या होात्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womans jewellery stolen in tulsibagh pune print news rbk 25 mrj