लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे : पोलीस चौकीत पोलीस शिपायाला शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बहीण आणि भावाला अटक करण्यात आली. हडपसर परिसरातील तुकाई दर्शन पोलीस चौकीत ही घटना घडली.
स्वरनील दिनेश सुरवाडे (वय २०), त्याची बहीण पूजा (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई सागर सूर्यवंशी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हडपसर भागातील तुकाई दर्शन परिसरात पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत स्वरनीलने तरुणीचा हात ओढल्याचे गस्त घालणारे पोलीस शिपाई सूर्यवंशी यांनी पाहिले. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्याला चौकशीसाठी तुकाई दर्शन पोलीस चौकीत नेले. पोलीस शिपाई शेलार आणि सूर्यवंशी यांना स्वरनीलने शिवीगाळ केली. काही वेळानंतर त्याची बहीण पूजा पोलीस चौकीत आली. तिने पोलीस चौकीत गोंधळ घालून शिवीगाळ केली, तसेच पोलीस शिपाई शेलार, सूर्यवंशी यांना धक्काबुक्की केली. पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार तपास करत आहेत.
आणखी वाचा-टोमॅटो, फ्लॉवर, शेवगा, मटारच्या दरात वाढ
गेल्या काही दिवसांपासून शहरात पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मध्यंतरी वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस शिपायाच्या पोटात वाहनचालकाने लाथ मारल्याची घटना हडपसर भागात घडली होती. हडपसर भागात सराइतांनी एका सहायक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती.