घरगुती व्यवसाय करणाऱ्या फारशा न शिकलेल्या महिला..कुणी शिवणकाम करणारी, कुणी पाऊच- पिशव्या बनवणारी, कुणी फुलांचे हार ओवणारी, तर कुणी अंगणवाडी सेविका..सगळ्यांची घरेही लहान- लहान. आपल्यालाही मोठे घर हवे या महत्त्वाकांक्षेतून पन्नास जणी एकत्र आल्या, प्रत्येकीने घरच्यांना विश्वासात घेऊन भांडवल आणले आणि त्या स्वत:च झाल्या बांधकाम व्यावसायिक!
‘झेप- ओन्ली वुमेन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी’ ही महिलांनी महिलांसाठी चालवलेली बहुदा पहिलीच बांधकाम कंपनी आहे. पुण्यातील ‘नवचेतना महिला नागरी सहकारी पतसंस्थे’च्या सभासद असणाऱ्या पन्नास महिला ‘झेप’च्या आजीव सभासद झाल्या आहेत. मनीषा शिंदे, मंगला सपार, उषा फळे, मीनाज शेख, वैशाली पारखी, मंगल अनपट आणि अशाच आणखी कितीतरी! या महिलांनी वडकी येथे गृहप्रकल्पासाठी सोळा गुंठय़ांच्या जागेत पैसे गुंतवले आहेत. सप्टेंबरमध्ये जागाखरेदीचा शेवटचा हप्ता भरल्यावर गृहप्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठी या महिला सज्ज होणार आहेत.
‘झेप’ कंपनीचे संस्थापक शांताराम मातेले तर चीफ प्रमोटर मनीषा शिंदे आहेत. याबाबत शिंदे म्हणाल्या, ‘मातेले यांनी नवचेतना पतसंस्थेच्या महिलांसमोर बांधकाम व्यवसायाची संकल्पना मांडली. मग प्रत्येक आजीव सभासदाने दोन लाख रुपये जमवून भरावेत असे ठरले. हे दोन लाख रुपये एकदमच भरणे बंधनकारक न ठेवता ते चार हप्त्यांत भरण्याची मुभा होती. अगदी सहजपणे भांडवल उभे राहिले आणि जागा खरेदीही झाली. वडकीचा गृहप्रकल्प येत्या दोन वर्षांत उभा राहणे अपेक्षित आहे. कंपनीच्या सभासदांपैकी कुणाचे पती अभियंता आहेत, तर कुणाला वास्तुस्थापत्यशास्त्रात गम्य आहे, कुणाचे नातेवाईक वायरिंगची कामे घेतात, तर कुणी फरशा बसवण्याची कामे करतात. अशा प्रकारे प्रकल्पाची कामेही सभासदच करवून घेणार आहेत. बांधकामातील ज्या गोष्टी आम्हाला अनोळखी आहेत त्या आम्ही माहितगारांकडून समजावून घेत आहोत.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरमहा पाच हजारांचा लाभांश
आजीव सभासदांना वडकी येथील गृहप्रकल्पात नऊ लाखांत घर मिळणार आहे. तसेच पाच वर्षांनंतर दरमहा प्रत्येकीला पाच हजारांचा लाभांश देण्याचेही कंपनीने जाहीर केले आहे. केवळ एकच गृहप्रकल्प करून या महिला थांबणार नाहीत. आणखीही महिला कंपनीच्या सभासद होऊ लागल्या आहेत. पहिला प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर कंपनीतर्फे इतर ठिकाणी जागा घेऊन काम सुरू ठेवण्यात येणार आहे. पुढील प्रकल्पांत घर घेणाऱ्या सभासदांना बाजारभावावर एक टक्का सूट मिळणार आहे. तसेच घरासाठी ग्राहक आणणाऱ्या सभासद महिलेला एक टक्का कमिशन दिले जाणार आहे.