पुणे : विवाहित तरुणीला जातीवाचक शिवीगाळ तसेच पतीला घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. करुणा शर्मा यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी आरोप केले होते.
याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती विरोधात कौटुंबिक हिंसाचार, अनैसर्गिक अत्याचार, मारहाण, धमकावणे तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात करूणा शर्मा ( वय ४३, रा. सांताक्रुज, मुंबई) सहआरोपी आहेत.
हेही वाचा >> पुणे : पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, तोतया पोलीस पसार; वारजे पोलिसांकडून शोध
तक्रारदार तरुणी येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर भागात राहायला आहे. तरुणीच्या पतीला घटस्फोट पाहिजे होता. करूणा शर्मा यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगत तो तिच्यावर दबाब टाकत होता. पती आणि करुणा शर्माने घटस्फोट देण्यासाठी दबाब टाकल्याचे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
हेही वाचा >> पुणे : पोलीस भरतीच्या आमिषाने तरुणांची फसवणूक, तोतया पोलीस पसार; वारजे पोलिसांकडून शोध
शर्मा यांनी हॉकीस्स्टिकने मारहाण करण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच पतीने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे तरुणीने फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.