पुणे : देशातील डॉक्टरांची शिखर संघटना म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनकडे (आयएमए) पाहिले जाते. या संघटनेतच महिलांना पुरेसे प्रतिनिधित्व आतापर्यंत न मिळाल्याची बाब समोर आली आहे. देशभरात आयएमएच्या अंतर्गत असलेल्या ४६ डॉक्टर संघटनांपैकी केवळ ९ संघटनांचे नेतृत्व सध्या महिला डॉक्टर करीत आहेत. याचवेळी आयएमएच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आतापर्यंत केवळ एकच महिला डॉक्टर विराजमान होऊ शकली आहे.

दिल्लीतील जॉर्ज इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थने केलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. या अभ्यासानुसार, इंडियन मेडिकल असोसिएशनची स्थापना १९२८ मध्ये झाली. तेव्हापासून असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्षपद केवळ एका महिलेने भूषविले आहे. आयएमएच्या अंतर्गत देशभरात ४६ संघटना आहेत आणि त्यापैकी केवळ ९ संघटनांचे अध्यक्षपद महिला डॉक्टरांकडे आहे. असोसिएशनमध्ये सुरुवातीपासूनच पुरूष डॉक्टरांचे वर्चस्व राहिले आहे. महिलांचे प्रतिनिधित्व कमी असल्याने त्यांच्या प्रश्नांकडेही दुर्लक्ष झाले आहे.

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना

आणखी वाचा-श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडणारा गजाआड, अल्पवयीन साथीदार ताब्यात; चार गुन्हे उघड

आयएमएचे देशभरात सुमारे साडेतीन लाख डॉक्टर सदस्य आहेत. डॉक्टरांचे संरक्षण आणि त्यांचे हित जपण्याचे काम ही संघटना करीत आहे. मात्र महिलांना प्रतिनिधित्व देण्यात ही संघटना कमी पडली आहे. आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्षपद आतापर्यंत एकाही महिला डॉक्टरकडे गेलेले नाही. हीच परिस्थिती वैद्यकीय क्षेत्रातील इतर संघटनांची आहे. नॅशनल निओनॅटॉलॉजी फोरमचे अध्यक्षपद एकदाच महिलेला मिळाले आहे. याचवेळी फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीज इंडियाच्या ७३ वर्षांच्या इतिहासात केवळ १५ टक्के महिला अध्यक्ष आहेत, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

आयएमएमध्ये महिला डॉक्टर त्यांची कारकीर्द स्थिरस्थावर झाल्यानंतर प्रवेश करीत होत्या. गेल्या १० ते १२ वर्षांत हे चित्र बदलले आहे. महिला डॉक्टरांची संख्या वाढू लागली आहे. असे असले तरी संघटनेत महिलांची संख्या एक तृतीयांशपेक्षाही कमी आहे. भविष्यात महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. -डॉ. पद्मा अय्यर, माजी अध्यक्षा, आयएमए पुणे शाखा

आणखी वाचा-श्री तुकाराम महाराज पादुका मंदिरातील दानपेटी फोडणारा गजाआड, अल्पवयीन साथीदार ताब्यात; चार गुन्हे उघड

आयएमएमध्ये लोकशाही पद्धतीने अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. त्यात महिला आणि पुरूष असा भेदभाव केला जात नाही. महिला डॉक्टरांना कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळीवर संतुलन राखावे लागते, त्यामुळे कदाचित त्या इकडे जास्त वेळ देऊ शकत नसाव्यात. महिला डॉक्टरांनी पुढाकार घेतल्यानंतर त्या अध्यक्ष झाल्याची अनेक उदाहरणे आयएमए पुणे शाखेत आहेत.-डॉ. अविनाश भोंडवे, माजी अध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र

आयएमएमध्ये स्थानिक पातळीवर महिलांचे प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात आहे. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर हे प्रतिनिधित्व कमी आहे, कारण संघटनेसाठी अधिक वेळ द्यावा लागतो. महिला डॉक्टरांवर कुटुंबाची जबाबदारी असते आणि व्यावसायिक जबाबदारी सांभाळून संघटनेला अधिक वेळ देणे शक्य होत नाही. भविष्यात अधिकाधिक महिला डॉक्टर पुढे येऊन ही जबाबदारी सांभाळतील, असा विश्वास आहे. -डॉ. शिवकुमार उत्तुरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष, आयएमए