पिंपरी- चिंचवड: भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधकांनी या व्हिडिओवरून भाजपाला आणि किरीट सोमय्या यांना घेरलं आहे. आक्षेपार्ह व्हिडिओचे विधानसभेत ही पडसाद उमटल्याचे पाहायला मिळालं. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या महिला संघटिका सुलभा उबाळे यांनी देखील किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन करत चांगलाच समाचार घेतला. भाजपाच्या पोपटाचे विकृत चाळे, किरीट सोमय्या यांचा धिक्कार असो अशा आशयाचे फलक घेऊन किरीट सोमय्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवारी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली. विरोधकांनी भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर सडकून टीका केली आहे. भ्रष्टाचाराची पोल खोल करणारे किरीट सोमय्या यामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. आक्षेपार्ह व्हिडिओवरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याच बघायला मिळालं.

आणखी वाचा-किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरण : काँग्रेस पक्षाच्या महिलांनी गंगाजल शिंपडून पुणे महापालिकेतील ‘ती’ जागा केली शुद्ध

महिला संघटना सुलभा उबाळे म्हणाल्या, किरीट सोमय्या सारखा नेता महिलांचं शोषण करतो आहे. महिलांसोबत अश्लील चाळे करतो. दुसरीकडं नेत्यांच्या मागं ईडी लावणे चौकशी करणे अशा गोष्टी करतात. आता महिलांच्या बाबतीत अशा प्रकारचे व्हिडिओ समोर येत आहेत. किरीट सोमय्या यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता. महिलांनी या चार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.