पुणे : शहर पोलीस दलातील एका पोलीस ठाण्यातील ११ महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार अर्ज दिला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शहराच्या दक्षिण भागातील एका पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकाविरुद्ध महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस आयुक्त रितेशकुमार यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दिला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस ठाण्याचे कामकाज पाहणाऱ्या हवालदाराविरुद्ध (डीओ) गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या अर्जाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात आली.
हेही वाचा – पुणे- गोरखपूर दरम्यान धावणार उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या
वेळावेळी बंदोबस्त लावला जातो, बंदोबस्तावर असतानादेखील हजेरी बंधनकारक केली जाते, सकाळची हजेरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक न घेता ठाणे अंमलदार घेतात. ठाणे अंमलदार वरिष्ठ पोलीस निरीक्षकासारखे वागतात, आजारपणात सवलत दिली जात नाही, आजारपणाच्या रजेत घरी कर्मचारी पाठवून पडताळणी केली जाते, पोलीस उपायुक्तांकडून अर्जित रजा मंजूर असतानादेखील रजा दिली जात नाही. पारपत्र कामकाज पाहणाऱ्यांना बंदोबस्त दिला जात नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत.