लोकसत्ता वार्ताहर
शिरुर : जागतिक महिला दिनानिमित्त शिरुर पोलीस स्टेशन येथील महिला पोलीस यांनी शिरुर शहरातून बाईक रॅली काढून महिला सबलीकरणाचा संदेश दिला.
जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोलीस स्टेशन मधील सर्व महिला पोलिस अंमलदार यांना फेटे बांधून साडी भेट दिली. सर्व महिला पोलिस अंमलदार यांनी शिरूर शहरांमधून बाईक रॅली काढली व महिला सबलीकरणाचा संदेश देण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त शिरूरच्या महिला वकील भगिनींनी, गोकुळ वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत गप्पागोष्टी करत, त्यांच्या भावना, विचार समजून घेत, त्यांचे काही क्षण सुखाचे, आनंदाचे करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी शिरूर वकील संघाच्या महिला उपाध्यक्षा ॲड.वर्षाराणी वडगावकर, ॲड. सीमा काशीकर, ॲड. सुवर्णा वाघमारे, ॲड. सरिता खेडकर, ॲड. अमृता वा खारे, ॲड.प्रणिता जोशी, ॲड. प्रतिभा पठारे, ॲड. शुभांगी गायकवाड, ॲड. पल्लवी कांकरवाल, ॲड.सोनाली अच्छा, इत्यादी महिला वकील भगिनी उपस्थित होत्या. मातोश्री कला क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने शिरुर शहरातील राजमाता अकॅडमीच्या प्रा. अलका बेलोटे (बोरुडे ),ॲक्टिव्ह सोशल ग्रुपच्या प्रमुख कामिनी प्रकाश बाफना आयुर्वेदाचार्य डॉ. स्मिता बिपिन बोरा ,उद्योजिका व माजी सरपंच वर्षा फक्कड काळे यांना सन्मानचिन्ह व शाल देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर म्हणाले की व्यक्ती व समाजाच्या जडघडणीत महिलांचा वाटा मोठा असुन प्रत्येक क्षेत्रात महिलांची आघाडी आहे . प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्व व यशाचा ठसा महिलांनी उमटविलेल्या असल्याचे ते म्हणाले . यावेळी आदिती आढाव , डॉ . बिपीन बोरा , शैलेश जाधव , सतिश केदारी आदी उपस्थित होते.
महिला दिनाचे औचित्य साधून शिरूर येथील वात्सल्य सिंधू फाउंडेशन च्या वतीने शिरूर नगरपालिकेच्या प्रेरणा उद्यान म्हणजेच कचरा डेपो येथील महिलांना सेफ्टी शूज चे वाटप करण्यात आले. यावेळी प्राची वाखारे, वात्सल्य सिंधू संस्थेच्या उषाताई वाखारे व स्वाती थोरात, सतिश व्यवहारे उपस्थित होते.