महिलांबाबत समाजात असलेले रूढीवादी विचार आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पाऊल टाकले आहे. महिला सुरक्षा आणि लिंगसमानतेबाबत जागृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची सूचना यूजीसीने देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संसदेच्या स्थायी समितीने ‘अ‍ॅस्ट्रॉसिटीज क्राइम अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन’ अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या संदर्भाने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने यूजीसीला पत्र पाठवले होते. त्यात महिलांचे हक्क, समाजातील महिलांची सुरक्षितता या बाबत तरुणांमध्ये जागृती करण्यासाठी या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत समितीने सुचवले होते. या पार्श्वभूमीवर यूजीसीने परिपत्रकद्वारे महिला सुरक्षा आणि लिंग समानता जागृती यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची सूचना महाविद्यालये आणि विद्यापीठांना दिली आहे, असे यूजीसीने परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women safety gender equality awareness included in college curriculum abn