महिला दिनी पुण्याच्या वडगाव मावळमध्ये मोरया महिला प्रतिष्ठान च्या रणरागिनींनी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त केला. या दारूच्या अड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिक, महिलांना त्रास व्हायचा. महिलांच्या छेडछाडी च्या घटना घडत होत्या अखेर आज महिलांनी एकत्र येऊन हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त केला.

वडगाव मावळ येथील रेल्वे स्थानकाच्या भागात चालणारा हातभट्टी दारूचा अड्डा महिलांनी एकत्र येऊन उद्धवस्त केला आहे. यामुळे महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडगाव च्या रेल्वे स्थानकालगत हातभट्टी दारू चा अड्डा आहे. यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या शाळकरी मुले, मुली, महिला, नागरिक यांना मद्यधुंद व्यक्तीच्या त्रासाला सामोरे जावे लागचे. अनेकदा महिलांची, मुलींची छेड काढल्याचा घटना देखील त्या भागात घडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. हातभट्टी चा अड्डा बंद करण्याबाबत पोलिसांना निवेदन दिले, परंतु तो अड्डा तात्पुरता बंद व्हायचा आणि पुन्हा जैसे थे परिस्थिती असायची. आज अखेर महिला दिनाचे औचित्य साधून काही महिलांनी एकत्र येऊन हातभट्टी चा अड्डा उद्धवस्त केला आहे. तेथील महिलेला संबंधित महिलांनी दुसरा व्यवसाय करावा अस सांगितलं असून तुम्हाला आम्ही मदत करतो अस सांगण्यात आले.

Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
sexual harassment crime victim, compensation,
लैंगिक छळाच्या गुन्ह्यात पीडितेला नुकसान भरपाईचा आदेश देणे अपेक्षित…
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……