पुणे : मुद्रण व्यवसायात पैसे गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाला दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी एका महिलेला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपर्णा अशोक गिरी (रा. श्रीमंत अनिकेत सोसायटी, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत प्रेमचंद पितांबर भोळे (रा. निगडी, प्राधिकरण) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमचंद भोळे आणि अपर्णा गिरी यांची २०१८ मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी महिलेने प्रेमचंद मुद्रण व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविले होते. मीडिया हाऊस सुरू केल्यास चांगला परतावा मिळेल, असे तिने भोळे यांना सांगितले होते. तीन कोटी रुपये गुंतवण्याचे आमिष तिने भोळे यांना दाखविले होते. सुरुवातीला भोळे यांनी दोन कोटी ४९ लाख रुपये गुंतवले. त्यानंतर गिरीने त्यांना नफा मिळाल्याचे सांगून वेळोवेळी ४४ लाख ९० हजार रुपये दिले.

हेही वाचा – रामदास भटकळ यांना जीवनगौरव पुरस्कार

त्यानंतर गिरीने त्यांना कोणताही परतावा दिला नाही. उर्वरित दोन कोटी चार लाख दहा हजार रुपये परत करण्याबाबत भोळे यांनी तिच्याकडे विचारणा केली. तेव्हा तिने पैसे देण्यास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भोळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे तपास करत आहेत.

हेही वाचा – पुणे : रॅप साँग चित्रीकरण प्रकरणाचा अहवाल उद्या मिळणार, संबंधितावर कारवाई होणार – कुलगुरू डॉ. कारभारी काळे

बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक प्रकरणी गुन्हा

निगडी प्राधिकरणातील मोकळी जागा विक्रीच्या आमिषाने अर्पणा गिरीसह तिघांनी एका बांधकाम व्यावसायिकाची दोन कोटी ७६ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी गिरी हिच्यासह नरेंद्र शेंगर, धर्मा गोल्हार यांच्या विरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women who did fraud with businessmen arrested pune print news rbk 25 ssb
Show comments