आज महिला दिन महिलांचा सन्मान आणि कौतुक करण्याचा दिवस,आपण एका अश्याच कर्तृत्ववान महिला अधिकाऱ्याची संघर्षमय वाटचाल पाहणार आहोत. त्यांनी आईची इच्छा पूर्ण करत पोलिस अधिकारी झाल्या यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली.पोलीस उपायुक्त असलेल्या स्मार्तना शांताराम पाटील यांची गगन भरारी आणि इच्छा शक्ती ही खरच कौतुकास्पद आहे. कुटूंबात मुलगा नाही याची खंत आई वडिलांना होती. परंतु,त्यांनी कधी जाणवू दिली नाही.यासाठी स्मार्तना शांताराम पाटील यांनी विद्यार्थी दशेत असताना आपण मुलापेक्षा देखील मोठं कर्तृत्ववान व्हायचं हे ठरवलं होत. ते त्यांनी प्रत्येक्षात उतरवलं असून आई सुनीता शांताराम पाटील यांची इच्छा पूर्ण केली आहे. त्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस उपायुक्त असून चांगल्या पद्धतीने पदभार सांभाळत आहेत.
पोलीस उपायुक्त स्मार्तना शांताराम पाटील यांचे वडील प्राध्यापक होते,घरात शिस्तबद्ध वातावरण असायचं. स्मार्तना या तिन्ही बहिणी मध्ये मोठ्या होत्या.त्यामुळे स्वतः ला मोठ्या भावाचे कर्तव्य पार पडायचं होतं.त्यात आईची आम्हाला शिकवण्याची धरपड कौतुक करण्याजोगी होती. आई सुनीता यांच स्वप्न होत, ते म्हणजे तिन्ही मुलींनी उच्च शिक्षण घ्यावं आणि स्वतः च्या पायावर उभे राहावे. त्यासाठी दिवसरात्र अभ्यास करून दहावीत आणि बारावीमध्ये ९० च्या पुढे टक्केवारी घेतल्याचे त्या आवर्जून सांगतात.यात आईचा खारीचा वाटा असून आई सुनीता या अभ्यास घेत होत्या.अस पोलीस उपायुक्त स्मार्तना म्हणाल्या.
विद्यार्थी दशेत असताना आपल्याला कठोर परिश्रम घेऊन मुलां पेक्षा मोठं व्हायचं त्यांनी ठरवलं होतं,त्यांनी तशी तयारी करायला सुरुवात केली.आईची प्रेरणा आणि आशीर्वाद सदैव सोबत होताच पण प्रबळ इच्छाशक्ती देखील होती.स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला, MPSC मध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले. त्या १९९९ साली नायब तहसीलदार झाल्या,परंतु त्यांनी पुन्हा स्पर्धा परीक्षा दिली यात त्यांना DYSP पद हवं होतं त्यांनी ते मिळवलं.खर तर त्यांना पोलीस अधिकारी व्हायचं होतं.त्यांच्या गावातील नागरिकांना आज त्यांचा अभिमान वाटत आहे,ते घरातील सर्व व्यक्तींचा आदर करतात अस पाटील म्हणाल्या.
शाळेत असताना अभ्यास करणं फार गरजेच होत,कारण नापास झाल्यानंतर कदाचित आमचं शिक्षण थांबल असत त्यामुळे अभ्यासावर विशेषतः भर द्यावा लागला जेणेकरून पुढे पास होत गेलो.एक बहीण प्राध्यापक असून दुसरी बहीण खासगी कंपनीत मोठ्या हुद्यावर आहे.हे सर्व आईमुळेच शक्य झाले आईने दिलेली प्रेरणा खूप महत्त्वाची ठरली.त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलीला जाणीव करून देण गरजेचं आहे की,मुलगी कुठलंही काम करू शकते.समाजातील असमानता केवळ स्त्रीच नष्ट करू शकते अस पोलीस उपायुक्त पाटील म्हणाल्या.