पिंपरी-चिंचवडमध्ये करोना योध्या महिलांना महिला दिनाचे औचित्य साधून मोफत मेट्रो सफर घडवली आहे. आज दिवसभर त्यांच्यासाठी मेट्रोतून सफर करण्याची सुवर्ण संधी आहे. यामुळं महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या अनपेक्षित संधीमुळे महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे.
भाजपाच्या महिला नगरसेविकांनी एकत्र येत करोना काळात महत्वाचं काम करणाऱ्या महिलांसाठी मेट्रोची मोफत सफर घडवली आहे. यामुळं करोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या, परिचारिका, डॉक्टर्स यासह इतर महिला कर्मचाऱ्यांना ही सुवर्णसंधी होती. नगरसेविका महिलांसह करोना योद्धा महिलांनी आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. सर्व, महिलांनी फेटा बांधून पिंपरी ते फुगेवाडी असा मेट्रोतून प्रवास केला. यामुळं महिला भाराहून गेल्या होत्या.
करोना काळात सर्वांनी सहकार्य केलं, त्याबद्दल करोना योद्धा महिलांनी महानगर पालिका प्रशासनाचे आभार मानलेत. तर, अनपेक्षित मेट्रो सफरमुळे महिलांमध्ये आनंद होता. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील मेट्रोचे उदघाटन झाले. त्यानंतर, हजारो पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी प्रवास केला अशी आकडेवारी मेट्रोकडून देण्यात आली होती. दरम्यान, महिला दिनाच औचित्य साधून भाजपाच्या महिला नगरसेविकांनी करोना योध्दा महिलांना दिलेलं सरप्राईज कौतुकास्पद म्हणावं लागेल.