शिरुर : जागतिक महिल दिनानिमित्त येथील जीवन विकास मंदिर शाळेत ‘माझी आई माझ्या शाळेत ‘ या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मातांची आरोग्य तपासणी करुन त्यांना संतुलित आहार व नियमित व्यायामाचे महत्व समजावून सांगण्यात आले .
महिला दिनानिमित्त शाळेच्या वतीने नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात येत असतात . महिलांचे आरोग्य ही एक महत्वाची बाब असून संपूर्ण कुटुंबाची आरोग्यासह सर्व बाबीची काळजी घेणारी महिला स्वंत :च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते . महिलांनी स्वंत :च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे .
जीवन विकास मंदिर शाळेतील बालवाडी ते इयत्ता पाचवीच्या वर्गातील २०० हून आधिक मातांची आरोग्य तपासणी ग्रामीण रुग्णालय शिरुर यांचा वतीने करण्यात आली . त्याच बरोबर डॉ . सोनाली हार्दे व प्रियंका जावळे यांनी आरोग्य व आहार या विषयांवर मार्गदर्शन केले.
आरोग्य चांगले राहण्यासाठी पुरेशी झोप , संतुलित आहार , नियमित व्यायाम , नवीन गोष्टी शिकणे , चांगल्या छंदाची जोपासणा , आहारात कडधान्य व पालेभाज्याचा वापर व सकारात्मक विचार या गोष्टीना महत्व आहे आरोग्यांची हेळसांड अनेक आजारांना आमंत्रण देवू शकते . महिलांनी आरोग्य जपावे असे आवाहन हार्दे व जावळे यांनी केले .
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक , मुख्याध्यापक गंगाधर तोडमल , निशा कोल्हे , ज्योती विसापुरे ,वजिफा शेख , अर्चना सोनार, प्रगती जगताप ,ललिता शहाणे , शोभा दसगुडे , उज्जवला जाधव ,अश्विनी मोरे , अर्चना थोपटे , रेखा जाधव , अर्चना भोगावडे या शिक्षीका उपस्थित होत्या .
व्हीजन इंटरनॅशनल स्कूल मध्ये महिला दिनानिमित्त शिवव्याख्यात्या अर्चना भोर यांचे व्याख्यान झाले . महिलांनी कुटुंबाच्या आरोग्याचा काळजी बरोबर स्वंत :च्या आरोग्याची काळजी घ्या .स्वंत :वर प्रेम करायला शिका असे आवाहन त्यांनी केले . भारतातील कर्तृत्वान महिलांच्या जीवन कार्याचा आढावा त्यांनी घेतला . राष्ट्रमाता जिजाउ मॉ साहेब , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवावा असे आवाहन त्यांनी केले . कोणत्याही परिस्थितीत आपल्या चांगुलपणा कायम ठेवा , जेवढी जमेल तेवढी इतरांना मदत करा . छावा चित्रपट पहावा असे ही आवाहन त्यांनी केले .माते विषयी व माती विषयी कृतज्ञ असावे असे ही ते म्हणाले .
यावेळी प्रास्ताविक स्कूलच्या मुख्याध्यापिका पसक्कीन काशी यांनी केले . वात्सलयसिंधू संस्थेच्या उषा वाखारे , मुख्याध्यापिका स्वाती थोरात , वृषाली मुसळे , हिलिंग लिव्हिंगचे संतोष सांबारे , समस्त सकल मराठा समाज संघचे विश्वस्त अविनाश जाधव , आदी उपस्थित होते . सूत्रसंचालन शितल जाधव यांनी केले .