शिरुर: सन २०१६ ला ऑलिम्पिक मध्ये अपयश आले असले तरी ॲलिम्पिक साठी पात्र ठरले तेव्हाच मी जिंकले होते असे शिवछत्रपती पुरस्कार व अर्जून पुरस्कार प्राप्त धावपटू सावरपाडा एक्सप्रेस कविता राउत शिरुर येथे म्हणाल्या .येथील ज्ञानगंगा विश्व विद्यालय शिरुर येथे राउत यांच्या विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी हिलिंग लिव्हिंगच्या जानकी विश्वनाथन , ज्ञानगंगा विश्व विद्यालयाचे प्रा . डॉ . राजेराम घावटे ,पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे ,संतोष साबळे , महेश तुंगारकर , संतोष सांबारे ,खेळाडू आरती दसगुडे ,तुषार पाचुंदकर , नवनाथ फरगडे , आदी उपस्थित होते .विद्यार्थ्याशी प्रश्नोत्तराचा स्वरुपात संवाद साधताना राउत म्हणाल्या की माझ्या आदर्श भारताच्या सुवर्णकन्या पी . टी उषा होत्या .मला उड्डण परी नावाच्या धडा शिकण्यास होता . त्याचा ही प्रभाव माझ्यावर पडला . जीवनात यश अपयश असते त्यामुळे अपयशाचा विचार न करता जो पर्यत ध्येय साध्य होत नाही तो पर्यत प्रयत्न करीत राहा . विद्यार्थ्यानी अभ्यासा बरोबर खेळा कडेही लक्ष द्यावे . खेळात ही करियरची मोठी संधी आहे .
खेळात फिटनेस महत्वाचे आहे. पहाटे तीन पासून ३० ते ३५ कि . मीचा सराव ॲलिम्पिकचा वेळेस मी दररोज करायचे असे सांगून राउत म्हणाल्या की ॲलिम्पिक मध्ये अपयश आले तरी त्यासाठी पात्र झाले तेव्हाच मी जिंकले होते .यावेळी जानकी विश्वनाथ म्हणाल्या की प्रत्येक क्षणाचा उपयोग करा .जीवनाचा आनंद घ्या .प्रास्ताविक डॉ . राजेराम घावटे यांनी केले . स्वागत अमृतेश्वरी घावटे , दीपक घावटे व प्रा . सुधीर शिंदे यांनी केले .सत्रसंचालन प्रा . जयश्री खणसे यांनी केले तर आभार डॉ . नितीन घावटे यांनी मानले .