‘गोरे गोरे ओ बाके छोरे..’, ‘शोला जो भडके..’ अशी हिंदी चित्रपटांमधील अजरामर गीते अॅकॉर्डियनवर वाजवली जाणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ (गोल्डन इरा) मानल्या गेलेल्या १९४७ ते १९७० या कालावधीत चित्रपटगीतांमध्ये झालेल्या अॅकॉडियन वादनाची रसिकांना ओळख करुन देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य आहे.
६ मे हा दिवस ‘जागतिक अॅकॉर्डियन दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने अॅकॉर्डियन वादक अमित वैद्य यांनी ‘दि गोल्डन इरा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २ मे (शनिवार) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता निवारा वृद्धाश्रम सभागृहात हा कार्यक्रम होईल. प्रख्यात दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या कन्या आणि लेखिका रिंकी रॉय भट्टाचार्य आणि ‘गोल्डन इरा’च्या अभ्यासक प्रभा जोशी या वेळी उपस्थित राहणार आहेत. वैद्य यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
या कार्यक्रमात पाश्चिमात्य लोकसंगीतदेखील अॅकॉर्डियनवर सादर केले जाणार आहे. प्रभा जोशी कार्यक्रमाचे निवेदन करणार असून त्या चित्रपटाच्या सुवर्णकाळाविषयी बोलणार आहेत.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा