पिंपरीचे महापौर नितीन काळजे यांचे मत
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य सर्वाधिक महत्त्वाचे आहे. त्यांच्या सहभागाशिवाय पिंपरी-चिंचवड खऱ्या अर्थाने स्वच्छ होणार नाही, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले.
पिंपरी पालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरणदिनानिमित्त स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत पिंपळे सौदागर येथे ओला, सुका व घरगुती कचरा विलगीकरण मोहिमेचा प्रारंभ महापौरांच्या हस्ते झाला, तेव्हा ते बोलत होते. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, स्वच्छता अभियानाच्या सदिच्छादूत अंजली भागवत, सहआयुक्त दिलीप गावडे, पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
महापौर काळजे म्हणाले, शहरातील शेती संपुष्टात आलेली असून शहर वेगाने वाढते आहे. आगामी काळात शहरात कचऱ्याची समस्या उद्भवू नये म्हणून सर्वानी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत. नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करून द्यावा. आयुक्त म्हणाले, शहर अल्पावधीत झपाटय़ाने वाढले आहे. सर्वाच्या समन्वयाने आतापर्यंत विकासाची कामे झाली आहेत. यापुढेही सर्वाच्या सहकार्याने व सहभागाने शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू, शक्यतो सर्व शहराचा कचरा एकत्र आला पाहिजे. जपान हा प्रगत देश ४० प्रकारे कचरा विलगीकरण करतो. तसा आदर्श घेऊन पिंपरीतही शास्त्रीय पद्धतीने घनकचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या कामात सहकार्य करण्यासाठी पुढे आलेल्या संस्था, संघटना कौतुकास पात्र आहेत. सीमा सावळे म्हणाल्या, प्रत्येक नागरिकाने एक झाड दत्तक घेऊन झाडांना आई-वडिलांचे नाव देऊन त्याची जोपासना केल्यास ‘हरित शहर’ होण्यास वेळ लागणार नाही. एकनाथ पवार यांनी ही मोहीम म्हणजे स्वच्छतेची लोकचळवळ झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्तविक आयुक्त हर्डीकर यांनी केले. सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. सहआयुक्त दिलीप गावडे यांनी आभार मानले.