नारायणगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवरील जैवविविधता आणि वृक्षराजी अबाधित रहावी या उद्देशातून गुरुवारपासून (२१ मार्च) तात्पुरत्या स्वरूपात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जूनपासून पुढे किल्ल्यावर कायमस्वरूपी प्लास्टिक बंदी लागू करण्यात येणार आहे. जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांच्या संकल्पनेतून किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> पुण्यातील मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे गाडे अडले; काम कोण करणार यावरून तिढा

Plastic Flower Ban , Plastic Flower, Central Government ,
म्हणून सजावटीच्या प्लास्टिक फुलांवर बंदी नाही, केंद्र सरकारची उच्च न्यायालयात ही भूमिका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pop ganesh murti
पीओपी मूर्ती विक्री, विसर्जनास बंदी; माघी गणेशोत्सवात नियमांचे पालन करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
High Court orders No sale or immersion of POP Ganesh idols for Maghi Ganeshotsav
माघी गणेशोत्सवासाठी पीओपी गणेशमूर्तींची विक्री आणि विसर्जन नको
Re Sustainability Aarti Industries join hands in the field of plastics recycling
प्लास्टिक्स पुनर्प्रक्रिया क्षेत्रात री सस्टेटनिबिलिटी-आरती इंडस्ट्रीज एकत्र; संयुक्त कंपनीचे पाच वर्षांत ५,००० कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट
Pune Traffic Congestion, Amitesh Kumar,
पुणे : कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश
When will the dust settle on the Shivaji Park grounds
शिवाजी पार्क मैदानातील मातीचा धुरळा कधी खाली बसणार?
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!

सातपुते म्हणाले, की किल्ले शिवनेरीवर पाण्याची बाटली वगळता कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक तसेच तंबाखू , गुटखा, बिडी, सिगारेट, काडेपेटी घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात येणार आहे. वाढत्या उन्हामुळे फक्त पाण्याची बाटली किल्ल्यावर घेऊन जाण्यासाठी परवानगी असेल‌. ५ जूनपासून किल्ल्यावर कायमस्वरूपी प्लास्टिक पाण्याची बाटली घेऊन जाण्यासाठी बंदी असेल. वनविभाग जुन्नर आणि पुरातत्व विभागामार्फत येणाऱ्या शिवप्रेमीसाठी फिल्टर स्वरुपातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. किल्ले शिवनेरीवरील पर्यावरण जतन आणि संवर्धित राहण्यासाठी ठोस पावले वनविभागामार्फत उचलली जात आहेत. पर्यटकांनीही हातभार लावून तपासणीसाठी सहकार्य करावे , असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी केले.

Story img Loader