हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महापौर कार्यालयात आता अर्धा ग्लास पाणी
पाणीबचतीबाबत केवळ प्रबोधन करून किंवा घोषणा करून भागणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल, हे ओळखून महापौर प्रशांत जगताप यांनीच पुढाकार घेतला असून महापौर कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आता अर्धा ग्लासच पाणी दिले जात आहे. आवश्यकता वाटल्यास नागरिकाला पुन्हा अर्धा ग्लास पाणी दिले जात आहे.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापौरांनीच कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना अर्धा ग्लास पाणी देण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता सर्वाना अर्धा ग्लास पाणी देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. महापालिकेच्या सर्वच कार्यालयांमध्ये अशा प्रकारे कार्यवाही करावी आणि सर्व कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना अर्धा ग्लास व आवश्यकता असल्यास पुन्हा अर्धा ग्लास पाणी देण्याबाबत आदेश द्यावेत, अशी विनंती महापौरांनी आयुक्तांनाही केली आहे.
विहिरींच्या पुनर्भरणामुळे पाणीटंचाईतही दिलासा
रसिका मुळ्ये, पुणे</strong>
दुष्काळ, पाणीटंचाईचे भीषण दाखले रोज समोर येत असताना पुण्याजवळील काही गावांना मात्र अजूनही पाणीटंचाईची झळ बसलेली नाही. या गावांमधील विहिरींच्या पुनर्भरणाची मोहीम हाती घेण्यात आली होती आणि या वर्षीच्या दुष्काळात या मोहिमेचे यश सिद्ध झाल्याचे दिसत आहे.
पुण्याजवळील भूकुम गाव! या गावांत तीन जुन्या आणि पाण्याचा नैसर्गिक स्रोत असलेल्या विहिरी. तरीही गावाला पाणी पुरायचे नाही. मात्र सध्या पाणीटंचाईच्या परिस्थितीतही या गावासाठी पाणी न पुरणे ही बाब इतिहासजमा झाली आहे. ‘जलदेवता सेवा अभियान’ सुरू करून या गावांतील तिन्ही विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले. गावांतील तिन्ही विहिरी या वापरात नव्हत्या. या विहिरी उपसून स्वच्छ करण्यात आल्या. पहिली विहीर उपसताना गावांतील अनेकांचा विश्वास नव्हता. मात्र विहीर उपसल्यावर ओल आली आणि काही तासांत पाणी येऊ लागले. गावाला महत्त्व पटल्यानंतर उरलेल्या दोन विहिरी गावाने पुढाकार घेऊन श्रमदानांतून स्वच्छ केल्या. दोन विहिरींची खोली वाढवण्यात आली. गावांतील तिन्ही विहिरींचे पुनर्भरण २०११ ते २०१३ या दोन वर्षांत झाले. त्यासाठी आवश्यक होती तेथे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून काम करणाऱ्या कंपन्यांचे सहकार्य घेण्यात आले. आता या विहिरींचे पाणी गावाला पुरेसे होते आहे. अगदी पिण्यासाठीही हे पाणी वापरण्यात येते आणि त्याचे कोणतेही वाईट परिणाम गावाच्या आरोग्यावर दिसत नाहीत,’ असे या अभियानाचे शैलेंद्र पटेल यांनी सांगितले.
पौडजवळील विठ्ठलवाडीची गोष्टही काहीशी अशीच. गावातील विहिरीत सांडपाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे ती प्रदूषित झाली आणि हळूहळू तिचा वापर बंद झाला. या विहिरीचीही स्वच्छता गावाच्या सहभागांतून करण्यात आली. त्यातील सांडपाण्याचा प्रवाह वळवण्यात आला. आता या विहिरीचे पाणीही पिण्यायोग्य आहे. गावाला या विहिरीचाही आधार आता मिळाला आहे. गेल्या वर्षी ही विहीर स्वच्छ करण्यात आली होती.
याबाबत पटेल यांनी सांगितले, ‘गावात पाण्याची टंचाई असो किंवा नसो. मात्र पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपणे आवश्यकच आहे. विहिरी नुसत्या उपसल्या आणि त्यानंतर गावाने एकत्र येऊन स्वच्छ ठेवल्या तरीही पुरेसे आहे. मात्र काही गावांत विरोधही होते. नळाचे पाणी मिळत असते, मग गरज काय आहे अशी गावाची भावना असते. मात्र आपल्या गावांतील स्रोत जपले, तर त्या नळाच्या पाण्यावरही गावाला अवलंबून राहावे लागणार नाही. अनेक गावांमध्ये कार्यकर्ते जाऊन विहिरी स्वच्छ करून येऊ शकतात. मात्र गावाने एकत्र येऊन काम करणे अधिक महत्त्वाचे आहे.’
भोई प्रतिष्ठानचा ‘रंग बरसे’ यंदा रद्द
महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आपल्या बांधवांची होत असलेली ससेहोलपट आणि जनावरांचा बिकट झालेला चाऱ्याचा प्रश्न या गोष्टी ध्यानात घेऊन शंकरराव भोई प्रतिष्ठानतर्फे रंग बरसे हा उपक्रम यंदा रद्द करण्यात आला आहे.
पुण्यातील विविध स्वयंसेवी संस्थांमधील अनाथ आणि वंचित मुले या रंग बरसे उपक्रमाच्या निमित्ताने आनंदाची उधळण अनुभवतात. एकोणीस वर्षांची परंपरा असलेला हा उपक्रम यंदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अशा हजारो मुलांचा रंग खेळण्याचा आनंद हा कार्यक्रमच रद्द झाल्याने त्यांना उपभोगता येणार नाही. मात्र, प्रतिष्ठानतर्फे या मुलांना आवश्यक असे शैक्षणिक साहित्य या उपक्रमासाठीच्या राखीव निधीतून दिले जाईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी दिली.
पाण्याची टंचाई ही समस्या पुणेकरांनाही भेडसावत असून पाणीकपात करून सध्या त्यावर मार्ग काढण्यात येत आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच व्यापक समाजहिताचा विचार करूनच आम्ही रंग बरसे रद्द करण्याचे पाऊल उचलत आहोत. यातून लोकांनाही चांगला संदेश मिळेल, असा विश्वास डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केला.
धूलिवंदन, रंगपंचमीला पाण्याचा अपव्यय नको
धूलिवंदन आणि रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन महापौर प्रशांत जगताप यांनी महापालिका प्रशासनाला केले असून धूलिवंदन आणि रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्यासाठी कोणालाही टँकर देण्यात येऊ नयेत, असे आदेश महापौरांनी दिले आहेत. शासकीय, निमशासकीय तसेच खासगी जलतरण तलाव बंद ठेवण्याबाबतही महापौरांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे.
रंगपंचमीच्या दिवशी वॉटर पार्क तसेच अन्य ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा ठिकाणी रेन डान्स सारखे कार्यक्रम आयोजित करून पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांवर तसेच व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असेल तेथेही कारवाई करावी, असे पत्र महापौरांनी आयुक्तांना दिले आहे. नागरिकांकडून वा कोणत्याही संघटनांकडून पाण्याचा गैरवापर केला जाऊ नये, याची दक्षता घेण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत, अशीही मागणी महापौरांनी केली आहे.
निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह येथे ‘जलदौड’चे (रन फॉर वॉटर) आयोजन
पिंपरी-चिंचवड शहरात १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्यानंतर नागरिकांना पाण्याच्या काटकसरीचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी आता महापालिकेने कंबर कसली आहे. पाण्याचा अपुरा साठा आणि त्यातून उद्भवणारी संभाव्य टंचाई लक्षात घेता शहरातील विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून आतापासूनच पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात जलदौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये सर्व स्तरातील नागरिक सहभागी झाले होते.
कार्यक्रमात आयुक्त म्हणाले, जेथे पाणी असते, तेथे सजीवसृष्टी निर्माण होते. जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. पाण्याची बचत आवश्यक आहे. गंगा, यमुना या नद्यांच्या काठीच प्रारंभी वस्ती निर्माण झाली होती. निसर्गाच्या असंतुलनामुळे पर्जन्याचे प्रमाण कमी झाले आहे. सद्यपरिस्थिती पाहता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. महापौर म्हणाल्या, पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी जनजागृती मोहिमा आवश्यकच आहेत. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ए. ए. कपोले यांनी प्रास्ताविक केले. अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले. भारती फरांदे यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली.
पिंपरी पालिका व पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती सप्ताहांतर्गत निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह येथे ‘जलदौड’चे (रन फॉर वॉटर) आयोजन करण्यात आले. महापौर शकुंतला धराडे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. माजी महापौर आर. एस. कुमार, शहर अभियंता महावीर कांबळे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता ए. ए. कपोले, कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार, पिंपरीचे नगरसेवक राजू मिसाळ, वैशाली काळभोर, भारती फरांदे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय शेटभाळे, विकास पाटील आदींसह मोठय़ा संख्येने युवक सहभागी झाले होते.