पुणे : पुण्याचे पालकमंत्री होणार का ? आणि पुण्यातून निवडणूक लढविणार का, या दोन्ही प्रश्नांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी थेट आणि स्पष्ट शब्दात उत्तर दिले. मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही. लोकसभा निवडणूक लढवावी, अशी तुमची इच्छा आहे का, मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का, असा प्रतिप्रश्न करत त्यांनी केला. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना भेटलो नसल्याचे सांगत त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

हेही वाचा… पुणे : वर्गणीच्या वादातून बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार ; तरुण अटकेत

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार असून त्यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या फडणवीस यांना यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट आणि स्पष्टच उत्तर देताना मी पुण्याला पालकमंत्री म्हणून येणार नाही, मी लोकसभा लढवावी अशी तुमची का इच्छा आहे, मी तुम्हाला महाराष्ट्रात नको आहे का? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा… अंत्यविधी पाससाठी नातेवाईकांना यातना ; वैकुंठ स्मशानभूमी आणि विश्रामबाग वाडा येथील पास सुविधा बंद

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या भेट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती चव्हाण यांच्याबरोबर अशी कुठलीही भेट झाली नाही असेही फडणवीसांनी सांगतिले. तसेच मंत्री मंडळाच्या विस्ताराबाबत विचारले असता, मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader