पुणे : संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक-लेखक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाचे माजी प्रमुख डॉ अशोक कामत (वय ८३) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, मुलगा, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. कामत यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये एम.ए., पीएच.डी. पदवी आणि विपुल ग्रंथलेखन करणारे डॉ.अशोक कामत हे एक प्रमुख लेखक होते. सावित्रीबाई पुणे विद्यापीठातील संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख म्हणून अनेक वर्षे कार्य करून ते निवृत्त झाले होते. ‘महाराष्ट्र के नाथपंथिय कवियोंका हिंदी काव्य’ या विषयावर त्यांनी हिंदीत प्रबंध लिहून पीएच.डी. पदवी संपादन केली होती. मथुरा येथील जवाहर पुस्तकालयाने हा प्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशित केला आहे. डॉ. कामत यांनी ‘नामदेवांचे जीवन आणि त्यांचे हिंदी मराठी काव्य यांचा पुनर्विचार’ या विषयावर मराठीत प्रबंध लिहून १९८४ मध्ये दुसरी पीएच.डी. पदवी संपादन केली होती.
डॉ. कामत यांची ‘संत रोहिदास’, ‘आपला देश आपली माणसे’, ‘कबीर’, ‘स्वामी म्हणे’, ‘माझा नाथसंप्रदाय’, ‘श्री नामदेव: एक विजययात्रा’, ‘ज्ञानदेव भगिनी मुक्ताबाई’, ‘गोस्वामी तुलसीदास’, ‘संत आणि समाज’, ‘सुभाषमय दिवस’, ‘संत कथा’, ‘संत नामदेव आणि गुरु नानकदेव’, ‘सिक्ख गुरुचरित्र’, ‘संत नामदेव आणि संंत एकनाथ’, ‘पसायदान’, ‘शाहू महाराज’, ‘मातृहृदयी सानेगुरुजी’, ‘शिवविचार, ‘ऐसी हे समर्थ पदवी’, ‘भक्त भारती’, ‘महात्मा बसवेश्वर’, ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ अशी साहित्यसंपदा आहे.
स्वतंत्र ग्रंथलेखनाबरोबरच त्यांनी अनेक ग्रंथांचे स्वतंत्र आणि सहकाऱ्यांसमवेत संपादन केले होते. ‘वीरशैव संतसाहित्य’, ‘मना सज्जना’, ‘एक तरी ओवी अनुभवावी’, ‘संत एकनाथ : एक समग्र अभ्यास’ हे त्यांपैकी काही प्रमुख ग्रंथ आहेत. संत लक्ष्मण महाराजांसह अनेक संतांच्या अभंग गाथांचे त्यांनी संशोधन संपादन आणि प्रकाशन केले आहे. डॉ. कामत यांचे हिंदीत ‘मानपुरी पदावली’, ‘भक्तकवी ठाकूर’, ‘महाराष्ट्र के नाथपंथिय कवियोंका हिंदी काव्य’, ‘आचार्य दामोदर पंडित’, ‘समर्थ रामदास’, ‘महायात्री नामदेव’, ‘महाराष्ट्र और राष्ट्रभाषा’, ‘जीवनधारा’ हे प्रमुख ग्रंथ आहेत.
डॉ. कामत यांच्या ग्रंथांना भारत सरकार अहिंदी लेखक पुरस्कार, कुमार साहित्य पुरस्कार, राष्ट्रमित्र पुरस्कार, वि. भि. कोलते पुरस्कार, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, महाराष्ट्र राज्य ग्रंथ पुरस्कार असे मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. २०१८ मध्ये त्यांना उत्तर प्रदेश शासनाचा सौहार्द पुरस्कार मिळाला आहे. कमी किंमतीत वाचकांना पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी कामत यांनी ‘गुरुकुल प्रतिष्ठान न्यास’या संस्थेची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संत नामदेव अध्यासनात वीसहून अधिक विद्यार्थ्यांनी पीएच. डी. संपादन केली आहे.हिंदी पाठ्य पुस्तक समिती, महाराष्ट्र साहित्य परिषद, भारतीय श्रीराम कोश मंडळ; भारतीय विद्याभवन महाविद्यालयीन समिती, महाराष्ट्र राष्ट्रसभा सभा, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ मराठी परीक्षा समिती अशा अनेक समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून काम केले होते. सध्या ते ‘सत्संग प्रतिष्ठान’द्वारे संतसाहित्य प्रचाराचे कार्य करीत होते.