पिंपरी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) विविध समस्यांची पाहणी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दौरा केला, मात्र त्यापुढे काय, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेचा कारभार भारतीय जनता पक्षाकडे आहे. राज्यातही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे निदान रुग्णालयाशी संबंधित प्रश्न सुटण्यासाठी फार काही परिश्रम करायची गरज नाही. राजकीय इच्छाशक्ती ठेवून काम केल्यास अनेक महत्त्वाची कामे हातावेगळी होण्यास वेळ लागणार नाही. एकनाथ पवारांची एकूणच कार्यपद्धती पाहता, केवळ राजकीय स्टंटबाजी आणि चमकोगिरी नको, तर ठोस कृती झाली पाहिजे. कमी खर्च आणि चांगले उपचार मिळावेत म्हणून राज्यभरातून हजारोंच्या संख्येने गोरगरीब रुग्ण या ठिकाणी येतात. त्यांचा भ्रमनिरास होता कामा नये, इतकी काळजी घेतल्यास सध्यातरी तितकेच पुरेसे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा