लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर वायसीएम रुग्णालयाच्या डॉक्टरला शिवीगाळ आणि मारहाण करणा-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रविवारी घडली.

महेश राजाराम कुंभार (वय २५ रा. वाघोली, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. ऋषीकेश हनमंत कुदळे (वय २५) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-राज्य सरकार, प्रशासनावर मागासवर्ग आयोगाच्या माजी सदस्याचे गंभीर आरोप…

आरोपी महेश याचे वडील राजाराम कुंभार वायसीएम रुग्णालयात दाखल होते. उपचारादरम्यान त्यांचे रविवारी निधन झाले. डॉ.ऋषीकेश यांनी ही माहिती नातेवाईकांना दिली. महेश वॉर्डमध्ये आला. वडिलांच्या मृत्यूबाबत डॉक्टरांकडे विचारपूस केली. त्यानंतर रागात येऊन, मोठ्याने ओरडून डॉ. ऋषीकेश यांच्या हाताला हिसका मारला. कानशिलात लगाविली. अश्लिल शिवीगाळ केली. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

Story img Loader