पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) पुणे जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने क्षमतेपेक्षा जास्त रुग्णसंख्या आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत परिचारिकांची संख्या कमी आहे. संत तुकारामनगर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ७५० खाटांचे ‘वायसीएम’ रुग्णालय आहे. या ठिकाणी औद्योगिकनगरीसह आजुबाजूच्या ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या इतर भागातूनही हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. यात अस्थिरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग, कर्करोग असे विविध विभाग आहेत. यात आठ प्रकारच्या विशेष सेवा उपलब्ध आहेत. त्यामध्ये कॉर्डीओलॉजी, युरोलॉजी, न्युरोसर्जरी, न्युरोलॉजी, पेडियाट्रीक सर्जरी, हॅण्ड आणि प्लास्टीक सर्जरी, मुत्रपिंडे, मज्जासंस्था अशा प्रकारच्या सुविधांचा समावेश आहे. दररोज सुमारे दोन हजार रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचार घेतात.
पिंपरी-चिंचवडमधील ‘वायसीएम’ रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण; मनुष्यबळाचीही कमतरता
अनेकदा शस्त्रक्रिया करण्यासाठी वैद्यकीय साहित्य रुग्णालयात उपलब्ध नसते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून साहित्य खरेदी करावे लागत आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-08-2023 at 12:52 IST
TOPICSपिंपरीPimpriपिंपरी चिंचवडPimpri Chinchwadपिंपरी चिंचवड महानगरपालिकाPimpri Chinchwad Municipal Corporationरुग्णPatient
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ycm hospital in pimpri chinchwad more patients than capacity lack of manpower pune print news ggy 03 css