लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये शनिवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. बिबवेवाडीसह काही भागांमध्ये गाराही पडल्या असून मध्यम ते त्याहून जास्त तीव्रतेच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा…. पुणे: मंचरमध्ये भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ, १७ जणांवर जीवघेणे हल्ले
शनिवारसाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून शहरात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, उन्हाच्या तीव्र झळांमुळे कमाल तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रतेमुळे मध्यमहून अधिक स्वरुपाच्या पावसाच्या सरींचा इशारा देण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग लक्षणीय राहणार असल्याने तातडीचे नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहनही आयएमडीकडून करण्यात आले आहे.