पुणे : शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला येरवडा पोलिसांनी पकडले. येरवडा भागात ही कारवाई करण्यात आली. फिराेज नासीर खान (वय २०, रा. शेलार चाळ, गाडीतळ, येरवडा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. खान याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला २६ जून रोजी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग करुन तो येरवडा भागात आल्याची माहिती येरवडा पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली. त्याला शेलार चाळ परिसरातील मोकळ्या जागेत सापळा लावून पोलिसांनी पकडले. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा…कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा

गंभीर गुन्हे दाखल असलेले, तसेच दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना शहरातून तडीपार करण्यात येते. तडीपार केल्यानंतर गुंड आदेशाचा भंग करुन पुन्हा शहरात वास्तव्यास असल्याचे दिसून आले आहे. महिनाभरात दहा तडीपार गुंडांना आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yerawada police arrested gangster who was tadipar from pune city and district pune print news rbk 25 sud 02